उपनिषद – अभ्यासारंभ!

दोन तीन आठवडे कामानिमित्त घराबाहेर होतो आणि ह्या दिवसांमध्ये एक तरी पुस्तक वाचायचं असं ठरवलं होतं. ऐनवेळेस मात्र सामान भरताना पुस्तक काही ठेवलं गेलं नाही. ज्या मित्राकडे उतरलो त्याच्याकडे टिपॉयखाली एक पुस्तक ठेवलं होतं. ठळक इंग्लिश मध्ये नाव लिहिलं होतं, “द उपनिषद” ( The Upanishads by Eknath Easwaran ). आपल्या भारतीय प्राचीन संस्कृतीबद्दल आणि ज्ञात-अज्ञात ऋषीमुनींनी / साध्वीनी लिहिलेल्या गद्य-पद्य साहित्याबद्दल ओढ सगळ्यांनाच असते. काहींना गर्व, अभिमान, जाज्वल्य अभिमान पण असतो. पण चायला, कधी ते वाचायला आणि वाचून चिंतनाला वेळ मिळालेला नसतो. कित्ती तरी अशे मोठे मोठे व्हाट्सअँप मेसेजस पूर्णपणे न वाचताच फॉरवर्ड केले जातात. त्याला गणती नाही. मीही काहीसा त्याच कॅटेगरी मधला. आवड असून सवड नसलेला. असो. तर हे ईश्वरन सरांचं पुस्तक चाळायला घेतलं.

उपनिषद ह्या आपल्या प्राचीन साहित्यामध्ये, आत्ता आपल्याला अज्ञात असेल्या पण जाणत्या ऋषीमुनींनी / साध्वीनी त्यांना त्यांच्या “स्व ” तत्वाचा अभ्यास करताना आलेल्या दृष्टांताबद्दल लिहिलेलं आहे. आता ह्याच दृष्टान्ताला Insights म्हण्टलं, अभ्यासाला investigation म्हंटल आणि “स्व ” तत्वाला consciousness म्हंटल , म्हणजेच ” insights achieved through investigation of consciousness itself .. ” म्हंटल कि कुठे आपल्या  millennial मेंदूचे कान टवकारतात.. तशेच माझे टवकारले आणि मी मित्राला सांगितलं कि मी हे पुस्तक घेऊन जातो, आणि अशा प्रकारे मी उपनिषदांना भेटलो.

मी स्वतः काही फार adventurer नसलो तरी पुण्यातला असल्यामुळे सह्याद्रीची तोंडओळख आहे. कुठल्या ही गिर्यारोहणाला (ट्रेकला) गेलो कि कुठल्याना कुठल्या वळणावर , पायवाटेवर , कठड्यावर एकांताची अनुभूती येतेच. आजूबाजूला कुणीही नसतं आणि नजर जाईल तिथवर अथांग निसर्ग असतो. शांतपणे नजर जाईल तिथपर्यंत बघत राहील की जाणवतं कि हि नजर जातीये तिथेही काहीतरी आहे आणि त्याही पलीकडे काहीतरी असेल.. आणि त्याही पलीकडे. मी फारच tangent लिहितोय असं वाटत असेल तुम्हाला, पण हे पुस्तक वाचायला घेतलं आणि सुरवातीपासूनच मी captivate झालो कारण हे बाह्य जगाचं exploration इतकं रम्य आणि गूढ असतं, तर उपनिषद तर आपल्या आंतरिक जगाचं / विश्वाचं exploration आहे. आपल्याला ह्या बाह्य , दृश्य जगाच्या पलीकडील काहीतरी “दाखवण्याचा” प्रयत्न ह्या अज्ञात साध्वीन्नी आणि मुनींनी केलाय. पण हे डोळ्यांनी बघायचं नाही म्हणून तर मॅटर आहे 🙂 एक एक्सपेरिमेंट करा. 15 मिन. टाइमर लावून डोळे बंद केल्यावर अंधारवजा जे दिसतं ते फक्त observe करा.. जमलं तर उत्तम नाहीतर असा विचार करा की अश्या कित्येक स्वतःमध्ये डोकावण्याचा मोहिमा यशस्वी केल्यावर, हजारो वर्षांपूर्वी ह्या अश्या consciousness मधल्या टूर्स मध्ये उमगलेले ज्ञान , आजूबाजूच्या गोष्टींचा फारसा संदर्भ न देता , ह्या ज्ञानाची किंवा अनुभूतीची क्षणचित्रं काढून ठेवली ह्या रचनाकर्त्यानी. काहीसं असं की पुणे मुंबई मधल्या आपल्या सोसायटी च्या गेटच्या बाहेर न पडलेल्या व्यक्तीला, कुठून तरी पत्र येतं आणि त्यात हिमालयामधल्या हिमशिखरांच किंवा ऍमेझॉन मधल्या गर्द जंगलाचं किंवा आइसलँड मधल्या Northern lights च वर्णन असतं. आता असं हे पत्र वाचल्यावर खरंच त्या व्यक्तीला आणि त्यांचा बंदिस्त बुद्धीला नक्कीच वाटेल, कि ह्या, हे काही खरं नाहीये!?

जसं तैत्तिरीय उपनिषदामध्ये “आनंदाचं” unit आधीच define केलंय. म्हणजे एक तरुण, निरोगी, संस्कारी, जगातील सगळी संपत्ती (point to be noted, All the money that exists on this earth! ) ज्याचा कडे आहे अशी व्यक्ती जितकी आनंदी असेल , हे आनंदाचं एक युनिट आहे असं ग्राह्य धरलं तर त्याच्या शंभर पट आनंद गंधर्वांना असतो , त्याच्या शंभरपट पितरांना, त्याच्या शंभर पट देवांना…. you get the idea . आणि शेवटी लिहिलंय कि ह्या अत्युच आनंदाच्या स्तिथीमध्ये जो असतो त्याच्या शंभरपट आनंदी तो असतो ज्यांनी “ब्रह्मन् ” जाणलंय आणि विषय किंवा वासनेचा त्याग केलाय. म्हणजे पहिले त्यांनी प्रॉपर , एक युनिट define केलंय आणि मग त्याचा वापर करून पॉईंट प्रूव्ह करायचा प्रयत्न केलंय कि ही गोष्ट जणालीत तर तुम्ही किती आनंदी असाल..कितीही डोक्यावरून चाललंय असं वाटत असलं तरी आपण नोलान चे पिच्चर बघतोच ना? तसंच काहीसं उपनिषद वाचताना ठरवून वाचायला लागतं कि डोक्यावरून चाललंय पण नाही कळलं तरी एकदा वाचूया. मी तर अगदीच surface scratch करतोय पण पुढच्या काही काळात ह्या विषयी अजून नक्कीच वाचणार आहे.

तैत्तिरीय उपनिषदामध्ये अन्नावरती पण लिहिलंय. “अन्न हे शारीरिक व्याधींवरचं सर्वात उपायकारक औषध आहे.. आणि अन्नाचा नेहमी आदर करा!” आता हेच Dietician नी शुगर लेवल वाढलीये म्हणून सांगितलं कि आपल्याला नक्की पटेल! अश्या पण काही फारच relatable गोष्टी मधुनच वाचायला मिळतात आणि उपनिषद ४ हजार वर्षांपूर्वी लिहिलेली आहेत असं वाटतच नाही. अजून एक तेजोबिन्दु उपनिषद मध्ये लिहिलंय कि ब्रह्मन् ( मी जास्त खोलात जात नाही ब्रह्मन् हि कन्सेप्ट क्लिअर करायला, पण आत्ता साठी तुम्ही ह्याला ultimate रिऍलिटी म्हणू शकता , ज्यानी एकदम प्रॉपर peace ऑफ माईंड मिळणारे.. ), तर ब्रह्मन् अश्या लोकांना मिळू शकत नाही कि जे लोभ, क्रोध, गर्व, मत्सर, विद्येचा अहंकार बाळगतात. एकदम क्लिअर कट सांगितलंय आणि हे काहीनाकाही प्रमाणात आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. बाकीही संतांनी हे सांगितलं आहेच. संत कबीर म्हणतात ” कामी, क्रोधी , लालची , इनसे न भक्ती होय, भक्ती करे कोई सुरमा, जाती , वर्ण , कुल खोय! , किंवा संत तुकाराम म्हणतात ” तुका म्हणे देह भरला विठ्ठल, काम क्रोध केले घर रिते !” एवढंच काय बायबल आणि कुराणमध्ये पण अशे दाखले आहेतच. पण उपनिषद मध्ये सरळसोटपणे सांगितलंय कि हे जमणार नसेल तर हे होणार नाही. सर्वांना माहित असतं, एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर लोभ, क्रोध, गर्व, मत्सर.. वगरे गोष्टींना बळी पडून चालणार नाही पण, कळतंय पण वळत नाही न.. थोडं offtopic पण तैत्तिरीय उपनिषदामधलं हा श्लोक वाचताना मला वासेपूर मधला रामधीर त्या मुनींच्या रूपात आलाय असं वाटलं आणि तो सांगतोय, “बेटा, तुमसे न हो पायेगा!” पण.. मी वाचणार!

अजून एक, छान्दोग्य उपनिषदामध्ये इंद्र (म्हणजे देव ) आणि विरोचन ( भक्त प्रह्लादाचा मुलगा , असुर ) अशे दोघे प्रजापती ( ब्रह्मदेव ) कडे जातात, त्यांना “आत्मन” म्हणजे self बद्दल जाणून घ्यायचं असतं . पहिला प्रश्न विचारायच्या आधी त्यांना प्रजापतींकडे ३२ वर्ष राहावं लागतं. त्यानंतर त्यांना गुरूकडून म्हणजे प्रजापतीकडून आत्मन बद्दल काही insights मिळतात आणि ते परत जायला निघतात पण इंद्राचं समाधान नाही होतं म्हणून तो परत येतो आणि प्रजापतीना म्हणतो, ” सर , अजून एक डाउट आहे..?” प्रजापती म्हणतात, “तू बरोबर विचार करतोयस, अजून ३२ वर्ष रहा माझ्याकडे मग मी तुला अजून सांगतो!” ते काय सांगतात आणि छान्दोग्य उपनिषद तर तुम्ही वाचाच ( किंवा मला कॉफी ला बोलवा, आपण डिटेल मध्ये बोलू!) पण ३२ वर्ष थांबावं लागलं तरी चालेल, पण ही गोष्ट जाणून घ्यायचीच आहे, हा पण एक संदेश ह्या उपनिषदामधून मला तरी मिळाला , जाणवला. गुरु वर श्रद्धा तर हवीच , आणि सबुरी पण!

महात्मा गांधींचं उपनिषदावरील एक प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. ते म्हंटले होते कि “हिंदू धर्मातील सगळे ग्रंथ, वेद, साहित्य एकदम बेचिराख झालं आणि इषोपनिषद मधील पहिला श्लोक जर लोकांचा ध्यानात राहिला तरी हिंदू धर्म अनंतकाळ टिकेल!” इषोपनिषद तर तुम्ही वाचाच, ते तुम्ही वाचाल तेव्हा वाचाल (Pun Intended !) पण ह्या पहिल्या श्लोकाचा गाभा आहे ” तेन त्यक्तेन भुञ्जीथा ” , इंग्रजी मध्ये ” Renounce and enjoy “. renounce म्हणजे त्याग. म्हणजे त्याग करा आणि उपभोग घ्या..  खूपच oxymoronish आहे आणि विषय खोल आहेच पण प्रत्येकानी स्वतःच ह्यावर विचार करावा लागतो. मला तर jungle बुक मधलं “bare necessities ” गाणं आठवलं हे वाचताना.. तुम्हाला काय वाटलं ते मला सांगा!

इषोपनिषद मधला अजून एक श्लोक , जो कदाचित तुम्ही ऐकला असेल.
ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात् , पूर्ण मुदच्यते,
पूर्णस्य पूर्णमादाय, पूर्ण मेवा वशिष्यते।

इंग्रजी मध्ये ह्याच ट्रान्सलेशन असं होईल:
All this is full, All that is full
From fullness, fullness comes.
When fullness is taken from fullness.
Fullness still remains..

फिज़िक्स मध्ये आपण Law of conservation of energy घोकलेला आठवतोय?
Energy can neither be created nor be destroyed. Can only be converted from one form to another and total amount of energy remains the same.
मला तरी उपनिषद मधला हा श्लोक आणि फिज़िक्स मधल्या ह्या कायद्यामध्ये साम्य वाटलं. तुम्हाला कदाचित नाही वाटणार किंवा काही वेगळं वाटेल. आपापल्या introspection नुसार पण अर्थ निघतातच. असो. आपल्या डिजिटल पिढीला relevant वाटतील अशे बरेच सिद्धांत किंवा बोली भाषेत, फंडे, मला जाणवत गेले आणि ह्या विषयी अजून वाचन नक्की करावं हे मी ठरवलंय. अनेक भारतीय , परदेशी जाणकारांनी मुबलक लिखाण केलय उपनिषदांवर. पण काय आहे, घोड्याला पाण्यापर्यंत आणू शकतो…

बरं, उपनिषद ह्या शब्दाचा अर्थ आहे, “खाली जवळ बसणे.” म्हणजे माझी जरा कल्पनाशक्ती लावली तर मी चित्र डोळ्यासमोर उभा केलं कि गर्द जंगल झाडीत असेल्या आश्रमामध्ये , शांत पहाटे च्या प्रहरी , गुरु त्यांना ध्यान धारणा करताना आलेल्या अनुभूती आणि स्व: बद्दलचे ज्ञान सांगत आहेत आणि शिष्यगण ते त्यांच्या पायाशी बसून, श्रद्धेने ऐकत आहेत. श्रद्धा महत्वाची. आपण pre -requisite म्हणतो ना तशी.

गेले काही वर्ष आम्ही डेन्मार्क ला राहत होतो. संयोगानी मे २०२२ मध्ये पंतप्रधान मोदी तिथे दौऱ्यावर असताना मला त्यांना बघता आणि त्यांचे विचार ऐकायला मिळाले. कोपनहेगन मध्ये दिलेल्या भाषणात त्यांनी सांगितलं कि डेन्मार्क चे प्रख्यात शास्त्रज्ञ नील्स बोहर, ज्यांना १९२२ साली फिज़िक्स मधल्या योगदानासाठी नोबेल पुरस्कार मिळाला, ते म्हणाले होते कि मला प्रश्न पडले कि मी उपनिषदांकडे जातो. (I go to the upanishads to ask questions.) आता नील्स ना कदाचित quantum physics मधले प्रश्न पडले असतील ( उपनिषद आणि quantum physics गूगल ला टाका, बरंच काय काय मिळेल!) पण प्रश्न तर आपल्या सर्वानाच आहेत, आपण सारे अर्जुनच आहोत! जिथे कुठे उत्तर मिळायची शक्यता आहे तिथे “श्रद्धेने” जाणे आपल्या हातात. करूया प्रयत्न!

ह्या विषयावर माझ्या कडून अजून लिखाण घडेल अशी अशा करतो आणि R Rajamani ह्यांचा पुढील ओळी तुमच्या विचारपटलावर सोडून हा लेख संपवतो!

 

Nothing which is Everything,
Once wanted to become many things,
In the process, it created everything,
But Everything actually turned out to be nothing but nothing,
Still everything has something to do with nothing,
If you can think, everything actually is nothing other that nothing,
As only nothing can be created out of nothing.

5 Comments on “उपनिषद – अभ्यासारंभ!

  1. All this is super but mostly unknowable and difficut to grasp.Any way i would like read most of it.i will try .Thanks for update.

  2. ह्यावर अजुन नक्कीच वाचायला आवडेल.. फारच छान लिहिलय.. प्रत्यक्ष कधी उपनिषदे वाचता येतील की नाही माहीत नाही पण किमान तुझ्या ह्या लेख प्रपंचातून थोडी फार तरी ओळख होईल..

  3. पहिलं अभिनंदन ह्यासाठी की ‘असल्या’ विषयाला ‘ह्या’ वयात हात घातलास म्हणून.

    दुसरं ह्यासाठी की शक्य तेवढं सोप्या मराठीत एवढा गहन विषय मांडला आहेस.

    गाठभेट झाल्यास प्रत्यक्षात / आभासी तर ह्यावर नक्कीच चर्चा करायला आवडेल.

Leave a Reply to V B BARGAJE Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *