आठवेल का ग तुला?

मुक्ता काही दिवसांपूर्वी २ वर्षाची झाली. पहिले १४ महिने ती आई बरोबर झोपायची. नंतर तिला आम्ही ठरवून माझ्या बरोबर म्हणजे बाबा बरोबर झोपेल अशी सवय लावायला सुरवात केली.थोडक्यात गेले दहा महिने ती बाबा बरोबर झोपते आहे.
असा एकही दिवस नाही कि ती माझ्या खांद्यावर किंवा माझ्या थोपटण्याशिवाय किंवा माझा हात तिच्या पाठीवर, डोक्यावर नसताना झोपली असेल. कधी कधी तिची झोपेची वेळ झाली म्हणून एखादं काम अर्धवट सोडून मी तिला झोपवायला घेऊन जायचो आणि तिला उगाच झोपायची घाई करायचो. मला वाटायचं झोपली म्हणून अलगद तिला खाली ठेऊन काम पूर्ण करायला निघालो रे निघालो कि झोपाळलेल्या आवाजात “बाबू…” ऐकू यायचं आणि मी पुन्हा तिच्या शेजारी पहुडायचो, तिला थोपवत कि “बाबू इथेच आहे मुक्ता, झोप..”
सांगायचं कारण हे कि गेले ३ दिवस ती तिची ती झोपतीये.
८.३० – ९ वाजले कि स्वतः दूध पाहिजे म्हणते, तिला दूध बाटली दिली कि गादी पर्यंत कडेवर न्यायचं आणि खाली ठेवलं कि ती दूध पिणं चालू करते आणि आता पिता पिता तिची ती झोपून जाते.
गेल्या आठवड्यापर्यंत माझं थोपटणं, माझा हात तिच्या पाठीवर, माझं असणं लागत होतं आणि आता गेले ३ दिवस ते नाही लागते..
छोटीशी गोष्ट आहे तशी, “इन द ग्रँड स्कीम ऑफ थिंग्स”.. पण चायला. मलाच आज भारी हरवल्या सारखं वाटतंय. मन जरा जड झालंय कि थोडीशी गरज कमी झाली आपली, मुक्ता च्या आयुष्यामधली. कधी कधी मी तिला काहीसा त्रागा करून पण म्हणालो असीन कि “झोप यार मुक्ता, आहे मी इथेच..”
आणि आज.. तिला असं तिचं तिचं झोपलेलं पाहताना एका बाजूला ती मोठी होतीये ह्याचा आनंद आहे पण तिला ह्या गेल्या १० महिन्यातला माझ्या बरोबरचा आणि त्या आधी १४ महिन्यातला तिच्या आई बरोबरचा प्रवास आठवणार पण नाही आहे.. त्यामुळे ती हे मिस पण नाही करणार. आठवण नसेल तर आठवण कशी येणार.
आम्ही दोघे मात्र कायम मिस करणार.
बापरे. आई बाबा होणं कठीण असत, खूप कामं असतात वगरे वगरे माहीतच आहे पण चायला हे मात्र भलतंच अवघड आहे.
मुक्ता, आठवेल का ग तुला?
आठवेल का गं तुला रोज रात्री तुला झोपवायला कडेवर घेऊन मारलेल्या शंभर एक चकरा?
रिपीट वर लावलेलं देव-किशोरचं ‘हम है राही प्यार के, हम से कुछ ना बोलिये’?
दर ३ मिनीटांनी दाखवलेला तोच तो चांदोबा,
आणि दर तीन मिनीटांनी, त्याच चांदोबाकडे नव्याने बघून झोपाळलेली हसलेली तू?
रडत असताना तू खिडकीमध्ये घेऊन यायचो तुला,
आणि नेमका तेव्हाच तो काऊ यायचा समोरच्या खांबावर,
त्याला बघून तू झोपेत पण काय हसायचीस राव..
मी म्हणायचो तुला, “मुक्ता तो काऊ तुला म्हणतोय, गुड नाईट काव काव”!
कसलं काय पण मधूनच उसळी देऊनच उठायचीस,
जस काय करतीयेस गर्जना, ” मैं मेरी झोप नहीं दूंगी!”
मग घ्यायचो तुला कडेवर आणि क्षणात तुझं डोकं टेकायचं खांदयावर.
जाणवायचे गरम श्वास, आणि वाटायचं कि झोपतीये कि नाचवतीये तालावर?
काही म्हण पण ते तुझ्या डोक्याचं खांदयावर पडलेलं वजन,
आणि ते छोटेसे हात कवटाळून बसलेले माझ्या मानेला,
मी अक्षरशः श्वास रोखून म्हणायचो ह्या सृष्टीला,
कि बस ग जरा शांत, स्तब्ध. झोपूदे माझ्या बाळाला.
मग जाणवायचा तुझा हात, थोडी पकड सैल झालेला
मानेवर कळायची श्वासांमध्ये आलेली लयबद्धता
मान वळवून बघायचो तुझ्या कडे, नकटं नाक, ओठ फुशारलेले, डोळे मिटलेले
खरं सांगतो वाईट वाटायचं कि आजचा दिवस संपला,
तुझ्या बालपणातल्या आपल्या सहवासाचा अजून एक दिवस संपला.
आठवेल का ग तुला?
कोणी समोर नसताना तुझा बाबा असा हळवा झालेला?
तुझ्या झोपलेल्या शांत चेहऱ्याकडे बघून, मग आकाशाकडे नजर वळवून, ‘थँक्स अ लॉट’ म्हणणारा?
हळूच ते पांघरूण, हनुवटीपर्यंत नेऊन गालांवरून बोट फिरवणारा?
आणि दमलेली पाठ टेकवताना पुन्हा उद्या कधी येतोय आणि तुझ्याशी खेळायला मिळतंय हाच विचार करणारा?
आठवेल?
Category: Uncategorized
Ashakya bhari lihilayas! Jamach awadalay.
देसाई डोळ्यातून टचकन पाणी आल
हे क्षण इतके पटकन जातात आठवणी फक्त राहतात बघता बघता आपली पिल्लं मोठी होतात क्षणात हात सोडून पाळायला लागतात .
आपला हृदय त्याचे ठोके चुकतात ह्यांचा मोठ्या होण्याने
आता कशाशी मदत लागत नाही मला सगळं जमतं
तेव्हा वाटते नको जाऊस लांब मला सोडून धर माझा हात आपण एकत्र जाऊ.
Shantanu kharch khup chaan lihile ashes aapan Aai, Baba zalyvar samjte aaplya sathi Aai, Baba ni Kay Kay kele aahe te
क्या बात है!
खरंच बापलेकीच हे नात जितक साध, सरळ, सोप तितकच विविध पैलू असणारं हे अजब रसायन आहे.
जसजस हे नात बहरायला लागते तसतसे
ते पैलू प्रकाशीत होत जातात. आणि या प्रकाशाने दोघांचे आयुष्य प्रकाशीत होते.
याचा पुरेपूर अनुभव मला माझ्या दादांमुळे मिळाला.
तू आणि मुक्ता असेच बरहत राहा आणि हे समृद्ध अनुभव शब्दबद्ध कर जा. हा आपला अनमोल ठेवाच आहे.
खुपच सुंदर आहे. डोळ्यात अगदी पाणीच आले
शंतनु खूपच भारी लिहिलय.
ज्यांना ज्यांना मुली आहेत त्यांना हे वाचल्यावर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही… खूप सुंदर विचार मांडले आहेत.??
अस वाटत मुल एका सेकंदात मोठी झाली… पापणी लावते तोच मोठी होतात मुलं…
मुलीच आणि बापाचं नात फार जिव्हाळ्याच…
कधी कधी वाटतं आपल्या सगळ्यात जवळची मैत्रीण कोण असेल तर ती आपली स्वतःची मुलगी…
खूप कमाल लिहिलयस शंतनु…,
Blessings to u n ur family ?
Todlas Mitra , Lai Bhari! Mala sagla athavala majhya mulicha vagna Ani hya saglya goshti ??
Mastach ✨
Killer lihila aahes yaar. Ekdam 4 varsha maage gelo ani vatla…. Che…. Shabdach nahi milat aahet bhavna vyakta karayla…
Dole bharun gele etke ki shevte shabd disenase zale.
Aie baba athavle mala mazech.Tyanchi garaj khup ahe aaj hi pan dependency nahiye .I can relate ther feelings now.
Aie nehmi mhanaychi tu aie zalis ki samjel.tyacha artha ata samajtoy..
It’s pure emotion, 😍 can relate to each and every word. I read it twice without a translator, though am not that familiar with Marathi, surprisingly, mujhe samajh arahi thi, for a moment I felt ki ye to meri hi kahani, maybe ye har parent ki story hai and then I copied it to Google translator. Wow, you are a wordsmith, 🫡
And this gave me goosebumps,
मलाच आज भारी हरवल्या सारखं वाटतंय. मन जरा जड झालंय कि थोडीशी गरज कमी झाली आपली, मुक्ता च्या आयुष्यामधली. कधी कधी मी तिला काहीसा त्रागा करून पण म्हणालो असीन कि “झोप यार मुक्ता, आहे मी इथेच..”
Exactly the same feeling, meri mann ki baat kisine likh diya hai,I do get annoyed sometimes with my baby, but then bura lagta hai ki kuch dino baad will miss this moment.