झुरळ
काय झाली दशा आज
सगळच विचित्र सगळच विपरीत
जगावं का अशा ठिकाणी
जिथे सुर्य अंधाराच्या चाकरीत
किती करावा लाळघोटेपणा
काही मर्यादाच नाही
पण तो केल्या शिवाय
जगण्याला पर्याय उरला नाही
कुठे गेली ती माणुसकी
ती भावना दुसर्याला निरपेक्ष मदत करण्याची
असली जरी सत्ता पद प्रतिष्ठा
तरी त्याचा फक्त सदुपयोग करण्याची
एकच आता प्रश्न आहे मनात
करावा सहन कि करावा बंड
सामान्य माणूस झालाय एक झुरळ इथे
राज्यकर्ते आहेत राजे आणि त्यांचे सेनापती गुंड
पण ते म्हणतात ना कि फुटला जरी अणुबॉम्ब
मारतात सगळे जीव जंतू आणि प्राणी
झुरळ मात्र जगतात ह्या प्रलयात
मनाची समजूत घालण्यात हि शहाणी
एखादं झुरळच मग म्हणत की
अधून मधून येतेच अशी दरी
पण आता इतकी आहे तयारी
अखेरचा श्वास जो पर्यंत शरीरात
सुर्य असला जरी अंधाराच्या चाकरीत
लाऊया एक पणती ह्या काळोखात
पेटवू एक वणवा तिथेच
उठतील जेव्हा ज्वाला, बसतील चटके जगाला
आपण आहोत झुरळ, वाचावूच स्वताला,
खेटून एका कोपऱ्याला
होईल जेव्हा शांत सारे
विकलेला सुर्य मावळेल आणि येतील नभात तारे
येउन बाहेर कोपऱ्यातून
पुन्हा जोमानं आणि उम्मेदिन
सुरु करू बंद पडलेला माणसाचं जग नव्यानं
पूर्वे कडे बघा आली लालसर छटा
नवा एक सुर्य , उगवतोय क्षितीजातून..